मौलाना आझाद भारतीयांपर्यत पोचलेच नाही : डॉ. विश्वंभर चौधरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मौलाना आझाद भारतीयांपर्यत पोचलेच नाही : डॉ. विश्वंभर चौधरी
मौलाना आझाद भारतीयांपर्यत पोचलेच नाही : डॉ. विश्वंभर चौधरी

मौलाना आझाद भारतीयांपर्यत पोचलेच नाही : डॉ. विश्वंभर चौधरी

sakal_logo
By

मौलाना आझाद भारतीयांपर्यत पोचलेच नाही : डॉ. विश्वंभर चौधरी

पुणे, ता. १० : ‘‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे कार्य भारतीयांपर्यत न पोहोचल्यामुळे ते उपेक्षित राहिले. धर्म अभ्यासक असणाऱ्या आझाद यांचे शिक्षण हे आपल्या घरीच झाले. ते खऱ्या अर्थाने होम स्कूलिंगचे एक उत्तम उदाहरण आहे. महात्मा गांधी यांचे ते खरे अनुयायी होते,’’ असे विचार सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले.
मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि समाजवादी शिक्षण हक्क सभेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. चौधरी बोलत होते. देशाचे पहिले शिक्षण मंत्री असणाऱ्या मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जन्मदिवस २००८ पासून ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डॉ. शरद जावडेकर आणि डॉ. शमसुद्दिन तांबोळी उपस्थित होते.

डॉ. चौधरी पुढे म्हणाले, ‘‘मौलाना आझाद यांनी शिक्षण मंत्री असताना आयआयटी, साहित्य अकादमी, संगीत अकादमी, बहुउद्देशीय शाळा याबरोबरच समुद्रशास्र यांसारखे आधुनिक शाखांचे शिक्षण देण्यासाठी संस्थांची उभारणी केली. स्वातंत्र्य आंदोलनातही महात्मा गांधी यांच्यासमवेत त्यांनी देशभक्त म्हणून काम केले. त्यांनी सातत्याने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा मंत्र जपला.’’
कार्यक्रमात डॉ. जावडेकर यांनीही विचार मांडले. डॉ. तांबोळी यांनी मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्यसेनानी आणि शिक्षणमंत्री म्हणून देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वाघ यांनी केले तर, अप्सरा आगा यांनी आभार मानले.