‘शिक्षण दिनाबाबतची उदासीनता झटकून द्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिक्षण दिनाबाबतची
उदासीनता झटकून द्या’
‘शिक्षण दिनाबाबतची उदासीनता झटकून द्या’

‘शिक्षण दिनाबाबतची उदासीनता झटकून द्या’

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हे देशाचे पहिले शिक्षण मंत्री. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण पद्धती अस्तित्वात यावी, यासाठी ते आग्रही होते आणि तसे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून मानला जातो. परंतु तो देशभरात म्हणावा तितक्या स्वरूपात साजरा होत नाही. राष्ट्रीय शिक्षण दिनाबाबतची उदासीनता दूर करून मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करावा,’’ असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जन्मदिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु राष्ट्रीय शिक्षण दिन हा म्हणावा तितक्या स्वरूपात साजरा होत नसल्याची खंत डॉ. जोशी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करावा, याबाबत सरकारी पत्रक निघते. परंतु प्रत्यक्षात या दिवसाचे औचित्य साधून शिक्षणाविषयी चिंतन होणे आवश्यक आहे. सध्या देशात नवीन शिक्षण धोरण लागू करण्यात येत आहे, हे धोरण सर्वसामान्यांना समजावून सांगण्यासाठी या दिनानिमित्त कार्यक्रम हाती घेणे आवश्यक होते. शिक्षणाविषयी विविध उपक्रम, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा आयोजित करून हा दिवस साजरा केला जावा.’’