वानवडीमध्ये पाच झोपड्या आगीत जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वानवडीमध्ये पाच झोपड्या 
आगीत जळून खाक
वानवडीमध्ये पाच झोपड्या आगीत जळून खाक

वानवडीमध्ये पाच झोपड्या आगीत जळून खाक

sakal_logo
By

घोरपडी : वानवडी गावठाणातील शिवरकर चाळीमध्ये रात्री आग लागल्याने चार ते पाच झोपड्या जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या सहा बंबांच्या मदतीने साधारण एका तासात आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले. साधारण साडेअकरा वाजता या परिसरात मांडवाचे सामान ठेवलेल्या खोलीमध्ये शॉर्टसर्किट झाले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्या खोलीत ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होऊन आगीने भडका घेतला. त्यामुळे आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली, रात्रीची वेळ असल्याने सर्व नागरिक झोपलेले होते. अचानक धूर आणि आगीमुळे नागरिकांना जाग आली. घरातील सिलिंडर घेऊन काही नागरिक आगीच्या ठिकाणापासून दूर पळत सुटले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्व सामान, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले आहे.