‘मेगाजिपीकॉन’ची आजपासून सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मेगाजिपीकॉन’ची आजपासून सुरवात
‘मेगाजिपीकॉन’ची आजपासून सुरवात

‘मेगाजिपीकॉन’ची आजपासून सुरवात

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : ‘जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’तर्फे (जीपीए) ‘मेगाजिपीकॉन’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (ता. १२) आणि रविवारी (ता. १३) ही परिषद होणार आहे. परिषदेचे हे ३२ वे वर्षे आहे, अशी माहिती ‘जीपीए’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनावणे यांनी दिली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, खजिनदार डॉ. शुभदा जोशी उपस्थित होते.
‘समग्र मानवी आरोग्याकडे’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी ''यूरोलॉजीमध्ये रोबोटिक सर्जरी'', ''मधुमेहाचे व्यवस्थापन'', ''आहार आणि रक्तविज्ञान'', ''मधुमेह व्यवस्थापन'', '' लैंगिक औषधाची प्रासंगिकता'', ''व्हायरल न्यूमोनिया'', '' दत्तक प्रक्रिया आणि सरोगेट गर्भधारणा’, अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेचे उद्‍घाटन रविवारी होणार आहे. त्यावेळी कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुरेश अडवानी आणि रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख आणि ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.