शिक्षक भरतीसाठी नियमांत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक भरतीसाठी नियमांत बदल
शिक्षक भरतीसाठी नियमांत बदल

शिक्षक भरतीसाठी नियमांत बदल

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी नव्याने इच्छुक उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट) बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच या चाचणीनंतर आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा शिक्षक पदभरतीची जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, २०२२मध्ये होणाऱ्या ‘टेट’ चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांसाठी शिथिल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलमध्ये शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण बदल केले असून ते शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.

हे बदल लक्षात घ्या
- यापूर्वीच्या सरकारी निर्णयानुसार उमेदवारास ‘टेट’ परीक्षेत मिळालेल्या गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी मिळायची
- नव्या नियमानुसार आता उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणारी ‘टेट’ परीक्षा देणे अनिवार्य
- उमेदवाराचे आधीच्या परीक्षेतील गुण नवीन परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत
- शिक्षक भरतीच्या जाहिराती विविध टप्प्यांमध्ये शिक्षक भरतीच्या येणाऱ्या जाहिरातीमध्ये उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार तो उमेदवार निवडीसाठी पात्र ठरणार असला तरीही त्यासाठी त्याने पुन्हा अर्ज करणे आवश्यक
- शिक्षक भरतीच्या नव्या निर्णयानुसार, ‘टेट’करिता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील
- या चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही
- या चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यांतून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील
त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असणे अनिवार्य