अर्बन बँक्स फेडरेशनसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँक्स फेडरेशनसाठी आज मतदान
अर्बन बँक्स फेडरेशनसाठी आज मतदान

अर्बन बँक्स फेडरेशनसाठी आज मतदान

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : राज्यातील नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिक बँक्स फेडरेशनसाठी शनिवारी (ता. १२) संपूर्ण राज्यात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. तर, सोमवारी (ता. १४) मतमोजणी फेडरेशनच्या वडाळा येथील कार्यालयात होणार आहे.
या संदर्भात फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘‘फेडरेशनची यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्वानुमते ठरले होते. परंतु काही अनाकलनीय घटनांमुळे २१ पैकी केवळ १२ जागांवर बिनविरोध निवड होऊ शकली. त्यामुळे उर्वरित नऊ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणूक लढवीत असलेल्या उर्वरित उमेदवारांनी नंतर पॅनेलची स्थापना केली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार कोणत्याही पॅनेलचे नसून, ते स्वतंत्र असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
मुंबई विभागातून तीन जागांसाठी अनास्कर यांच्या पॅनेलतर्फे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट आणि सी. बी. अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या विरोधात सारस्वत बँकेचे किशोर रांगणेकर, अपना सहकारी बँकेने दत्ताराम चाळके व एन. के. जी. एस. पी. बँकेचे संदीप प्रभू निवडणूक लढवीत आहेत.
पुणे विभागातून दोन जागांसाठी विद्याधर अनास्कर व पुणे मर्चंट बँकेचे विजय ढेरे विरुद्ध कॉसमॉस बँकेचे मिलिंद काळे आणि आनंद गावडे अशी लढत आहे. महिला राखीव गटात अनास्कर यांच्या पॅनेलतर्फे महाडच्या अण्णासाहेब सावंत बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत व पुण्याच्या गणेश सहकारी बँकेच्या संगीता कांकरिया विरुद्ध सहकार पॅनेलच्यावतीने सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. शशी अहिरे व जवाहर बँकेच्या वैशाली आवाडे निवडणूक लढवीत आहेत.
अनुसूचित जाती-जमाती या राखीव गटातून दापोली अर्बन बँक जयवंत जालगांवकर आणि जनकल्याण बँकेचे नानासाहेब सोनावणे यांच्यात लढत आहे. कोकण गटातून ठाणे भारत बँकचे उत्तम जोशी विरुद्ध डोंबिवली बँकेचे मिलिंद आरोलकर अशी लढत आहे.