वायसीएमएच रुग्णालयाच्या आवारातून भरदिवसा वाहन चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायसीएमएच रुग्णालयाच्या आवारातून भरदिवसा वाहन चोरीला
वायसीएमएच रुग्णालयाच्या आवारातून भरदिवसा वाहन चोरीला

वायसीएमएच रुग्णालयाच्या आवारातून भरदिवसा वाहन चोरीला

sakal_logo
By

वायसीएमएचच्या पार्किंगमधून वाहन चोरी
पिंपरी, ता. ११ : पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएमएच) पार्किंगमधून भरदिवसा वाहन चोरीला गेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अतुल भारत कदम (रा. संघर्ष हौसिंग सोसायटी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. कदम यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये लॉक करून उभी केली होती. दरम्यान, सकाळी दहा ते दुपारी साडे बारा या कालावधीत ही दुचाकी चोरीला गेली.
दरम्यान, चिंचवड येथेही वाहन चोरीची घटना घडली. सचिन विश्वनाथ सोनवणे (रा. आनंदनगर, चिंचवड) यांची ७५ हजार रुपये किमतीची रिक्षा चोरीला गेली. आनंदनगर येथील स्टार बेकरीसमोरील रस्त्यावर त्यांनी लॉक करून रिक्षा उभी केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ही रिक्षा चोरली. या दोन्ही घटनेप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.