अतिवृष्टी, दरड अन् पुराचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टी, दरड अन् पुराचा फटका
अतिवृष्टी, दरड अन् पुराचा फटका

अतिवृष्टी, दरड अन् पुराचा फटका

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः देशाला यंदाच्या वर्षात नैसर्गिक आपत्तींचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधित २७३ पैकी १५७ दिवसांमध्ये देशाला पूर, अतिवृष्टी आणि दरडी अशा आपत्तींच्या सामोरे जावे लागले. परिणामी या नऊ महिन्यांमध्ये कृषी क्षेत्राचे झालेले नुकसान याबरोबरच दोन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या वर्षातील नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेण्याऱ्या ‘सेन्टर फॉर सायन्स अँड एन्व्हायरन्मेंट’च्या (सीएसई) अभ्यासातील आकड्यांच्या माध्यमातून हे समजत आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) मुक्काम वाढला आहे. मॉन्सून वेळेआधी आगमन करत असून परतीच्या प्रवासाला ही आता विलंब होताना दिसून येत आहे. यंदा ही देशात देशात २९ मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल चार महिने २५ दिवस मुक्काम केल्यानंतर संपूर्ण देशाचा निरोप घेतला होता. मॉन्सून काळात तसेच परतीच्या प्रवासादरम्यान विविध राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टी, पूर आणि दरड कोसळण्याच्या अनेक घटनांची नोंद झाली. त्यानुसार जुलैमध्ये गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राला पुराचा फटका बसला.

थंडीच्या लाटांचाही प्रभाव
देशात गेल्या १० महिन्यांमध्ये ३० वेळा थंडीच्या लाट आली होती. जानेवारी महिन्यात सर्वाधिक थंडीच्या लाटांचा अनुभव झाला होता. यामध्ये सर्वाधिक जास्त थंडीच्या लाटा मध्य प्रदेशात (२१ दिवस) पाहायला मिळाल्या. महाराष्ट्राला ही थंडीच्या कडाक्याने वेढले होते. राज्यात ६ वेळा थंडीच्या लाटेची अनुभूती झाली होती.

अहवालातील ठळक बाबी
- जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक दिवशी पूर, अतिवृष्टी किंवा दरडी सारख्या नैसर्गिक आपत्तीची अनुभूती
- यंदा जुलैमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा (१९८१-२०१०) १७ टक्के अधिक पाऊस (३२७.७ मिमी)
- राज्यात सप्टेंबर महिन्यातील १९ दिवसांमध्ये नैसर्गिक आपत्तींचा फटका
- मॉन्सूनच्या काळात जून ते सप्टेंबर दरम्यान १.८ दशलक्ष हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान
- १९५१-२०१५ या कालावधीत पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ
- यामुळे मॉन्सूनपूर्व पावसाची अनिश्चिततेत वाढ
- मध्य भारतामध्ये स्थानिक पातळीवरील मुसळधार पावसाच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढ
- शहरीकरणामुळे जमिनीवरील अतिक्रमण, हरित अच्छादन आदी स्थानिक स्तरावरील घटकांचा परिणाम

या राज्यांना सर्वाधिक फटका
राज्ये ः लोकांचा मृत्यू
आसाम ः २२१
हिमाचल प्रदेश ः १४३
मध्य प्रदेश ः ११२
महाराष्ट्र ः १०२
गुजरात ः १००

देशात मॉन्सून हंगामातील स्थिती अशी
महिना ः नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले मृत्यू ः एकूण पीक क्षेत्राचे नुकसान (हेक्टरमध्ये)
जून ः ७५७ ः २३६८६८
जुलै ः ८१३ ः १२१६५१
ऑगस्ट ः ४६६ ः ७५६५३८
सप्टेंबर ः ३९५ ः ६८२१३४