मौलाना अबुल कलाम आझाद जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मौलाना अबुल कलाम आझाद जयंती साजरी
मौलाना अबुल कलाम आझाद जयंती साजरी

मौलाना अबुल कलाम आझाद जयंती साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती विविध संघटनांतर्फे साजरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीतर्फे कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक येथे कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी मौलाना आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस पुनमीत तिवारी आणि दलित युवा संघटनेचे अध्यक्ष राहुल डंबाळे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस, इंटक कामगार संघटनेतर्फे इंटकचे कायदेशीर सल्लागार ॲड. फैयाज शेख यांनी मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी इंटकचे सरचिटणीस मनोहर गाडेकर, अनिल औटी, हमीद इनामदार, संजय मोरे, सुनील पंडित, ॲड. श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.