अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

बालदिनानिमित्त ‘मुकुला’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, ता. १२ ः नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बालदिनानिमित्त ‘मुकुला’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता. १४) सायंकाळी ६ वाजता मयूर कॉलनी मधील एमईएस बालशिक्षण मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. वय वर्षे ९ ते १९ या वयोगटातील कलाकारांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असून यामध्ये संगीतकार उदय रामदास यांचे शिष्य समूह सादरीकरण करणार आहेत. तसेच, याबरोबरच भरतनाट्यम गुरू आशा सुनीलकुमार यांची शिष्या आश्लेषा शिंदे या भरतनाट्यम, कथक गुरू शमा भाटे यांची शिष्या संतेरी अभ्यंकर या कथक सादरीकरण, तबलावादक नीलेश रणदिवे यांचे शिष्य गंधार निसाळ हे तबला तर पं. शौनक अभिषेकी यांचे पुत्र व शिष्य अभेद अभिषेकी हे गायन प्रस्तुती करतील. कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश आहे.

बालदिनानिमित्त ‘पियूची वही’ ऐकण्याची संधी
पुणे, ता. १२ ः साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे लिखित ‘पियूची वही’ हे पुस्तक ऐकण्याची संधी बालदिनानिमित्त मिळणार आहे. सोमवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ चॅनेलकडून या पुस्तकाचे प्रसारण करण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबरपासून पुढील १६ दिवस सकाळी ११ वाजता हे संपूर्ण पुस्तक ऐकता येणार आहे. या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण १५ नोव्हेंबरपासून पुढील १६ दिवस दुपारी साडेतीन वाजता होईल, अशी माहिती ‘विद्यावाणी’चे संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी दिली. या पुस्तकाचा वाचन स्वर, संगीत व शीर्षकगीत गायन प्रांजली बर्वे करणार आहेत. तर संगीत संयोजन अश्विनी महाजनी यांनी केले आहे. कार्यक्रमाची निर्मिती श्रीयोगी मांगले यांची आहे.