सिंहगड रस्ता फोटो फिचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड रस्ता फोटो फिचर
सिंहगड रस्ता फोटो फिचर

सिंहगड रस्ता फोटो फिचर

sakal_logo
By

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या लढायांपैकी एक म्हणजे किल्ले कोंढाण्यावरील ४ फेब्रुवारी १६७० रोजी सुभेदार तानाजी मालुसरे आणि मुघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्यात झालेली लढाई. किल्ले कोंढाण्याचा सिंहगड झाला, तो नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने. आजही हा किल्ला पुणेकरांसह जगभरातील शिवप्रेमींचे प्रेरणास्थान बनले आहे. किल्ले सिंहगडावर हिवाळ्यातील गुलाबी थंडीबरोबरच शिवप्रेमी पर्यटकांच्या भेटीही वाढल्या आहेत. हिंदवी स्वराज्य स्वर्णिम इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगडावरील पर्यटकांची वाढलेली वर्दळ दर्शविणारी ही क्षणचित्रे. (छायाचित्रे : विश्वजीत पवार)