‘लोकमान्य सोसायटी’च्या गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लोकमान्य सोसायटी’च्या गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात वाढ
‘लोकमान्य सोसायटी’च्या गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात वाढ

‘लोकमान्य सोसायटी’च्या गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’च्या विविध मुदत ठेव व गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ७ नोव्हेंबर २०२२ पासून सोसायटीने घेतलेल्या निर्णयानुसार ‘लोकमान्य’च्या मुदत ठेव योजना, पुनर्गुंतवणूक ठेव योजना, बचत ठेव योजना, कल्पवृक्ष ठेव योजना, आवर्ती ठेव योजना या आणि अन्य लोकप्रिय मुदतठेव व गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात ०.२५ टक्के ते ०.३० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
ठेवीदार, सभासद व गुंतवणूकदारांनी सद्यःस्थितीत सर्वोत्तम परतावा देणाऱ्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून उपलब्ध करून दिलेल्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉम’च्या (www.lokmanyaonline.com) माध्यमातून ठेवीदार-सभासदांना गुंतवणूक करता येईल. या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘लोकमान्य’च्या संकेतस्थळावर किंवा १८००२१२४०५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.