भरदिवसा गोळीबारकरून २८ लाख लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरदिवसा गोळीबारकरून २८ लाख लुटले
भरदिवसा गोळीबारकरून २८ लाख लुटले

भरदिवसा गोळीबारकरून २८ लाख लुटले

sakal_logo
By

पुणे ः शहरात शनिवारी पहाटे दुहेरी खुनाची घटना घडलेली असतानाच दुसरीकडे मार्केट यार्ड येथे भरदिवसा चोरट्यांनी अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयावर दरोडा टाकत २८ लाखांची रोकड लुटली. याबरोबरच चोरट्यांनी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथे घडली. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

मार्केटयार्ड येथील गेट नंबर दोन येथे गणराज मार्केट नावाची इमारत आहे. संबंधित इमारतीमध्येच द प्रोफेशनल कुरिअर नावाने अंगडीयाचा व्यवसाय चालतो. तर इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पोटमाळावजा जागेत त्याचे कार्यालय आहे. येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंगडीयाच्या कार्यालयात दोन कर्मचारी उपस्थित होते. ते काचेच्या केबिनमध्ये बसून त्यांचे नियमीत काम करीत होते. त्यावेळी एक व्यक्ती तेथे आला, त्यानंतर तो थेट कर्मचारी काम करीत असलेल्या काचेच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला. यातील एका कर्मचाऱ्याने त्यास धक्का देऊन बाहेर काढत दार लावून घेतले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने कोयता काढून केबिनची काच फोडली. तर त्याच्या मागून आलेल्या दुसऱ्या व्यक्तीने थेट पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली. त्यापैकी एकाने केबिनमध्ये घुसून तेथील रोकड बाहेरील व्यक्तीकडे दिली. त्यांनी रोकड पिशवीमध्ये भरून तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्यासह टीमने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी संबंधित कार्यालय व रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. दरोडेखोर दुचाकीवरून शिवनेरी रस्त्याने पुणे सातारा रस्त्याच्या दिशेने गेल्याचे चित्रीकरणात दिसून आले.