कावेरी महाविद्यालय आणि एक्सेएलआर यांच्यामध्ये करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कावेरी महाविद्यालय आणि एक्सेएलआर यांच्यामध्ये करार
कावेरी महाविद्यालय आणि एक्सेएलआर यांच्यामध्ये करार

कावेरी महाविद्यालय आणि एक्सेएलआर यांच्यामध्ये करार

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : कन्नड संघ संचलित कावेरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि एक्सेलआर यांच्यात दोन वर्षाच्या कालावधीसाठी सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना दरमहा एक मोफत अभ्यासक्रमाची सुविधा मिळणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक अग्रवाल आणि एक्सेलआरचे संचालक श्याम नारायण यांनी या करारावर नुकत्याच स्वाक्षरी केल्या. याअंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण झाल्यानंतरही एक्सेलआर एलएमएस मॉड्यूलमध्ये विषय शिकता येणार आहेत. एलएमएस मॉड्यूलमध्ये उजळणीसाठी रेकॉर्ड केलेली व्याख्यान सत्र उपलब्ध असतील. या कराराच्यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. मुक्ता करमरकर, प्रा. चित्रा अळवणी, डॉ. जयश्री बंगाली आदी उपस्थित होते.