बालमधुमेहींच्या संगोपनावर आज मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालमधुमेहींच्या संगोपनावर
आज मुलाखत
बालमधुमेहींच्या संगोपनावर आज मुलाखत

बालमधुमेहींच्या संगोपनावर आज मुलाखत

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः जागतिक मधुमेह दिन आणि राष्ट्रीय बाल दिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कारविजेते मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांची प्रकट मुलाखत आणि बाल मधुमेह दत्तक योजना सोहळा सोमवारी (ता. १४) आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या बाल मधुमेह दत्तक योजनेअंतर्गत बाल मधुमेहींची व्याधी दत्तक घेण्यात येणार असून त्यांना मोफत औषध वाटप दिली जाणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक डॉ. सतीश देसाई उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. नांदेडकर यांची ‘बालमधुमेहींचे संगोपनः समस्या आणि उपाय’ या विषयावर प्रकट मुलाखत होणार असून त्यांच्याशी ममता क्षेमकल्याणी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी पाच वाजता सेनापती बापट रस्त्यावरील ‘एमसीसीआयए’ ट्रेड टॉवरमध्ये सुमंत मुळगावकर सभागृहात होणार आहे.