संस्थाचालक गटाची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्थाचालक गटाची निवडणूक बिनविरोध
संस्थाचालक गटाची निवडणूक बिनविरोध

संस्थाचालक गटाची निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटातून अधिसभेवर पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. संस्थाचालकांच्या खुल्या गटातून डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ.अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, अशोक सावंत यांची आणि महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांची अधिसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

पुणे, अहमदनगर आणि नाशिक अशा तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठात पदवीधर, व्यवस्थापन प्रतिनिधी यांसह प्राध्यापक, प्राचार्य गटातील प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक घेतली जाते. सध्या संस्था प्रतिनिधींची अर्थात व्यवस्थापन प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक झाली आहे. ही बिनविरोध होण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या प्रयत्नांना यश आले.’’ अधिसभेसाठीची पदवीधर निवडणूक २० नोव्हेंबरला सकाळी दहा ते पाच यावेळेत ७१ महाविद्यालयात पार पडणार आहे. मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी होईल.