अंगणवाडी सेविकांचे आज आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविकांचे आज आंदोलन
अंगणवाडी सेविकांचे आज आंदोलन

अंगणवाडी सेविकांचे आज आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः मानधन वाढ, ग्रॅच्युइटीची अंमलबजावणी, केंद्रीय पातळीवर दिला जाणारा पोषण ट्रॅक्टर आहार ॲप्लिकेशन मराठीतून मिळणे आदी मागण्यांसाठी अंगणवाडी विविध संघटनांच्या कृती समितीतर्फे मंगळवारी (ता. १५) मुंबई आणि पुण्यात मोर्चा काढून निदर्शने करण्यात येणार आहेत.
अंगणवाडीत १४ वर्षे मदतनीस नसणे, इतर खासगी संस्थांची कामे करायला लागणे, अंगणवाडी वेळेव्यतिरिक्त कामकाज करायला लागणे, तीच-तीच माहिती पुन्हा-पुन्हा द्यावी लागणे, सादिल खर्चाची मर्यादा ओलांडूनही पदर मोड करून अंगणवाडीच्या कामकाजासाठी अंगणवाडी ताईंना खर्च करावा लागणे आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी पुण्यातील विभागीय महिला व बाल विकास उपायुक्त येथे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने निदर्शने होणार आहेत.