पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाण यांना
प्रचाराची जबाबदारी
पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी

पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले.
चव्हाण पुढील चार दिवस गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर असतील. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठका घेऊन संवाद साधणार आहेत. गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी काँग्रेसने महत्त्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातून चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
गुजरात काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तमरीत्या जबाबदारी याआधी निभावली आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने २००४ मध्ये गुजरातमध्ये १२ खासदार निवडून आणले. त्याच वर्षी गुजरातच्या खासदारांच्या संख्येमुळे काँग्रेस हा लोकसभेत एक नंबरचा पक्ष ठरला होता आणि काँग्रेस पक्ष मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्तेवर आला होता.