प्राण्यांच्या रक्षणासाठी ‘रेस्क्यू’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राण्यांच्या रक्षणासाठी 
‘रेस्क्यू’
प्राण्यांच्या रक्षणासाठी ‘रेस्क्यू’

प्राण्यांच्या रक्षणासाठी ‘रेस्क्यू’

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः वन्यप्राणी म्हटलं की डोळ्यांसमोर, वाघ, बिबट, हरिण येणे सहाजिकच. वाढत्या शहरीकरणामुळे पूर्वी जंगलात वावरणारे वन्य प्राणी मानवी वसत्यांमध्ये येत असून मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाली आहे. तसेच आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर आल्यानंतर अपघातामुळे अनेक वन्यप्राण्यांना इजा होते. अशात त्यांना सुरक्षितरित्या वाचविणे व त्यांच्यावर उपचार करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी पुण्यातील ‘रेस्क्यू’ चॅरिटेबल संस्था सातत्याने कार्य करत आहे. या संस्थेने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत अडीच हजारांहून अधिक वन्य प्राण्यांचा बचाव व पुनर्वसन केले आहे. रेस्क्यू या संस्थेमार्फत पुणे जिल्ह्यासह जवळपासच्या भागात ही वन्य प्राण्यांचे बचावकार्य केले जात आहे. तसेच त्यांचे पुनर्वसन संस्थेच्या महाराष्ट्र वनविभाग मान्यता प्राप्त बचाव व पुनर्वसन केंद्रात केले जाते.

अशी आहे प्रक्रिया
- वन्य प्राण्यांचे बचावकार्य करताना विविध कारणांसाठी या प्राण्यांना ‘टीटीसी’मध्ये दाखल करावे लागते
- अनेकदा अशा बचाव कार्यादरम्यान वन्यप्राणी आजारी असतात
- त्यांना वेळेत उपचार मिळणे आवश्‍यक असते
- यासाठी प्राण्यांना संस्थेच्या उपचार व पुनर्वसन केंद्रात दाखल केले जाते
- या केंद्रात अनाथ किंवा तस्करी दरम्यान सुटका करण्यात आलेल्या पक्षी व प्राण्यांचाही समावेश
- एखादा प्राणी पुनर्वसन केंद्रात प्रवेश करताच त्या प्राण्याबद्दलची महत्त्वाची माहिती ऑनलाइन प्रणालीवर नोंदवली जाते
- केंद्रात असताना नियमितपणे ही माहिती अपडेट केली जाते
- प्रत्येक दाखल केलेल्या प्राण्याची वन्यजीव पशुवैद्य आणि पुनर्वसनकर्त्यांकडून प्राथमिक तपासणी करून त्याची स्थिती, आवश्यक हस्तक्षेपाचा प्रकार, त्यानंतर वैद्यकीय पुनर्वसन योजना, कालमर्यादा आणि पुनर्वसन उद्दिष्टांसह डेटा तयार केला जातो

दृष्टिक्षेपात बचावकार्य
- मागील दहा महिन्यांत २५०० हजारांहून अधिक वन्यप्राण्यांचे बचावकार्य
- यामध्ये पाण्यातले व जमिनीवरची कासवं, माकड, बिबट, खवल्या मांजर, साप आदी
- तसेच वटवागळांसह इतर पक्ष्यांचा ही समावेश
- आतापर्यंत २०० हून अधिक प्रकारच्या प्रजातींच्या वन्यप्राण्यांचे पुनर्वसन केंद्रात उपचार
- वन्यप्राण्यांबरोबर पाळीव प्राण्यांचेही बचावकार्य
- पुण्यासह बारामती, दौंड, लोणावळा, नाशिक, सातारा, कोल्हापूरसह राज्यातील इतर भागात ही बचाव कार्य
- वन्य प्राण्यांचे बचाव कर्यासाठी २४ तास हेल्पलाइन सुविधा उपलब्ध
- महाराष्ट्र वनविभागाच्या सहकार्याने बचाव कार्य केले जाते
- यासाठी राज्य सरकारद्वारे मान्यता

वन्यप्राण्यांचे बचाव कार्य करताना त्यांची वैद्यकीय काळजी आणि पुनर्वसनासाठी पुण्यातील आमच्या वन्यजीव पुनर्वसन व उपचार केंद्रात दाखल केले जाते. या पुनर्वसन केंद्राला महाराष्ट्र वन विभागाने मान्यता दिली आहे. केंद्रात आलेल्या प्रत्येक वन्य प्राण्याला उपचार देणे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत ते बरे झाल्यावर पुन्हा या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे. हे संस्थेचे मुख्य उद्देश आहे.
- सुमेध तरडे, संवादप्रमुख, ‘रेस्क्यू’ चॅरिटेबल संस्था