चॅटिंगद्वारे महिलेला त्रास देणाऱ्यास बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चॅटिंगद्वारे महिलेला त्रास देणाऱ्यास बेदम मारहाण
चॅटिंगद्वारे महिलेला त्रास देणाऱ्यास बेदम मारहाण

चॅटिंगद्वारे महिलेला त्रास देणाऱ्यास बेदम मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः सराईत गुन्हेगाराच्या पत्नीला व्हॉट्सॲपद्वारे चॅटिंग करीत मानसिक त्रास देण्याचा प्रकार तरुणाला महागात पडला. संबंधित महिलेने तिच्या साथीदारांच्या मदतीने तरुणास बेदम मारहाण करीत त्याच्या गुप्तांगावर वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी या महिलेस अटक केली.

विनायक लोंढे (वय ३०) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. अटक केलेली महिला ही सराईत गुन्हेगाराची पत्नी आहे. तिच्या पतीचा काही वर्षांपूर्वीच टोळ्यांमधील वादांमध्ये खून झाला होता. दरम्यान, या महिलेची एका तरुणासमवेत मैत्री झाली होती. त्याचवेळी महिलेस काही कारणासाठी कर्जाची गरज होती, तर लोंढे हा एका कर्ज देणाऱ्या कंपनीमध्ये काम करीत होता. महिला त्याच्या संपर्कात आली. तिने त्याच्याकडे कर्जाची मागणी केली होती. त्यानंतर लोंढे हा महिलेस व्हॉट्सॲपवर सातत्याने चॅटिंग करीत होता. त्याच्या चॅटिंगचा महिलेस मानसिक त्रास होत होता. त्यामुळे महिलेच्या मनात त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात राग होता. त्यातच महिलेच्या मित्राने त्याने पाठविलेले मेसेज पाहिले, त्यानंतर महिलेने शनिवारी तरुणास आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका मंदिरालगतच्या मैदानावर बोलावून घेतले. त्यावेळी महिलेने तिचा मित्र व त्याच्या तीन साथीदारांनाही तेथे बोलावून घेतले होते. त्यांनी विनायकला मारहाण करीत त्याच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार केले. त्याचबरोबर त्याच्या गुप्तांगावरही वार करीत त्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.