राज्यात तापमानात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात तापमानात घट
राज्यात तापमानात घट

राज्यात तापमानात घट

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः राज्यात किमान तापमानाचा २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठा वाढण्याची चिन्हे आहेत. उत्तरेकडील येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.

राज्यात कमाल व किमान तापमानात चढ-उतार कायम आहे. सोमवारी (ता. १४) राज्यातील नीचांकी तापमान औरंगाबाद येथे १२.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तर विदर्भातील बऱ्याच ठिकाणी सरासरी किमान तापमानात ३ अंशांनी घट झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या खाली नोंदले गेले. त्या उलट मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात पुन्हा काहीशी वाढ झाली होती. सध्या आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५. ८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.
या प्रणालीपासून केरळ, तमिळनाडू, कोमोरीनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत (ता. १६) आग्नेय बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील २४ तासानंतर वायव्य भारतासह मध्य भारतात बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट अपेक्षित आहे. शहरात किमान तापमानात किंचित वाढ झाली. शहरात सोमवारी १३.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. शहरात मंगळवारी (ता. १५) पहाटे धुके पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

‘गारठा, धुके’ असे चित्र कायम
शहरात हवामान कोरडे असल्यामुळे येत्या रविवारपर्यंत किमान तापमान १२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठा असाच कायम राहू शकतो. सध्या शहरासह उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी गारठ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. दरम्यान किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्यामुळे पहाटे ‘गारठा, धुके’ असे चित्र कायम राहणार आहे.