वारजे-कोथरूडसाठी टेकडीवरून रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारजे-कोथरूडसाठी टेकडीवरून रस्ता
वारजे-कोथरूडसाठी टेकडीवरून रस्ता

वारजे-कोथरूडसाठी टेकडीवरून रस्ता

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः वारजे येथून कोथरूडला महत्मा सोसायटी परिसरात जायचे असेल तर एक तर कर्वेनगर किंवा कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाचा वापर करावा लागतो; मात्र आता नवा रस्ता प्रस्तावित केला असून, वारजे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पाण्याच्या टाकीच्या बाजूने थेट टेकडीवरून महात्मा सोयायटी पर्यंत उन्नत मार्ग (इलोव्हेटेड रस्ता) केला जाणार आहे. यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी तब्बल २१० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील वारजे आणि कोथरूड यांना जोडणारा १.९ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित केला आहे. वनदेवी मंदिराच्या मागे असलेल्या टेकडीवरून हा रस्ता दाखविण्यात आला आहे. वारजे येथील आंबेडकर चौक, पाण्याची टाकी, मिलेनियम स्कूल, तिरुपती नगर, शनिमंदिर, गोपिनाथ नगर या मार्ग हा रस्ता महात्मा सोसायटीकडे जातो. टेकडीवरून साधा रस्ता न करता तो ३० मीटर रुंदीचा इलोव्हेटेड मार्ग असणार आहे. सध्या वारजे माळवाडी या भागातील नागरिकांना कर्वेनगर येथे डाहणूकर कॉलनीतून महत्मा सोसायटीकडे जावे लागते, कोथरूड स्टॅंड येथून कोडरूडकडे जावे लागते किंवा कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाचा वापर करावा लागतो. हा मार्ग लांब पडतो. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डीपीतील रस्ता विकसीत करण्याची तयारी सुरू केली आहे.

सायकल ट्रॅकसाठी साडेतेरा कोटी
पुणे महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यातून विविध कामे केले जात आहेत. यामध्ये बिबवेवाडी रस्‍त्याच्या दोन्ही बाजूने सायकला ट्रॅक व पादचारी मार्ग विकसीत करणे यासाठी ७.२७ कोटी आणि भाऊ पाटील रस्त्यावर याच कामासाठी ६.२८ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. या कामासाठीही सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा सोसायटी हे अंतर टेकडीवरून १.९ किलोमिटर इतके आहे. त्यावर ३० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित केली जाईल. इलोव्हेटेड मार्ग केला जाणार असून, त्याचा अभ्यास करण्यासाठी व डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २१० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.
- व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमु पुणे महापालिका