जेवण न दिल्याच्या रागातुन तरुणांकडून हॉटेल मालकासह कामगारांवार जीवघेणा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेवण न दिल्याच्या रागातुन तरुणांकडून हॉटेल मालकासह कामगारांवार जीवघेणा हल्ला
जेवण न दिल्याच्या रागातुन तरुणांकडून हॉटेल मालकासह कामगारांवार जीवघेणा हल्ला

जेवण न दिल्याच्या रागातुन तरुणांकडून हॉटेल मालकासह कामगारांवार जीवघेणा हल्ला

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः हॉटेल बंद झाल्यानंतर फुकट जेवण देण्याची मागणी करणाऱ्यांना नकार दिल्याच्या रागातून तिघांनी हॉटेल मालकासह कामगारांवर धारदार शस्त्रांनी वार करत जीवघेणा हल्ला केला. ही घटना रविवारी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी येथील महामार्गालगतच्या परिसरात घडली. मंगेश विजय जडीतकर (वय २३, रा.पाटीलनगर, शिवणे), सौरभ प्रकाश मोकर (वय २२, रा. उत्तमनगर), शुभम अनिल सुद्देवार (वय २५, रा. वारजे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी चंद्रकांत वरवटे (वय ४६, रा. यशोदीप चौक, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.