गुरूदेव सेवा मंडळातर्फे सर्व संत स्मृती दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरूदेव सेवा मंडळातर्फे सर्व संत स्मृती दिन साजरा
गुरूदेव सेवा मंडळातर्फे सर्व संत स्मृती दिन साजरा

गुरूदेव सेवा मंडळातर्फे सर्व संत स्मृती दिन साजरा

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः श्री गुरूदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची ५४ वी पुण्यतिथी अर्थात सर्व संत स्मृती दिन नुकताच साजरा करण्यात आला. राजाराम शहाळे व सोपानराव डगवार यांच्या हस्ते तीर्थस्थापनेनंतर सकाळी सामुदायिक ध्यानाने पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात झाली. वीणा महिला भजनी मंडळाने भक्तीगीते सादर केली. श्रीराम पकडे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांवर आयुष्य व्यतीत करण्याचे आवाहन केले. या वेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मावळ तालुका अध्यक्ष शांताराम महाराज बोडके, गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र नावाडे, तसेच ग्रामगीताचार्य मनिषा बुचे, काळेवाडी आश्रमाचे कार्याध्यक्ष उत्तमराव चौधरी, सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदींनी मार्गदर्शन केले. या वेळी हणमोटे दादा, अनिल घोगरे, प्रदीप लांडे, सुधीर पकडे, अनिल खवले, विठ्ठलराव पाचबोले, शरदराव भजभुजे, बाबाराव ढोणे, पंजाबराव मोंढे उपस्थित होते.