पतंजलीच्या पाच आयुर्वेदिक औषधांवरील बंदी उठविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतंजलीच्या पाच आयुर्वेदिक औषधांवरील बंदी उठविली
पतंजलीच्या पाच आयुर्वेदिक औषधांवरील बंदी उठविली

पतंजलीच्या पाच आयुर्वेदिक औषधांवरील बंदी उठविली

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः पतंजली संस्थानच्या पाच आयुर्वेदिक औषधांवर घातलेली बंदी उत्तराखंड सरकारने नुकतीच मागे घेतली आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांची बदनामी सहन केली जाणार नाही. असा कोणी प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पतंजली संस्थानने स्पष्ट केले आहे.
पतंजलीची औषधे गेल्या ३० वर्षांपासून अधिक काळ नागरिक मोठ्या विश्वासाने वापरत आहेत. बहुसंख्य नागरिकांना त्यांचा चांगला अनुभव आहे. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे बदल झाला आहे. उत्तराखंड प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीवर पाच आयुर्वेदिक औषधांवर ही बंदी घातली होती. पतंजली संस्थान आयुर्वेदिक औषधांच्या प्रचार आणि प्रसारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ‘धर्म’ समजून कार्यरत आहे. पतंजलीची औषधे देशात तसेच परदेशात सगळीकडे वापरली जातात. योग आणि आयुर्वेद जगभर पोचविण्यासाठी पतंजली गेल्या ७५ वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र, उत्तराखंडमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ही बंदी घातली होती. परंतु, त्याचे वैद्यकीय आणि शास्त्रीय स्पष्टीकरण करण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारच्या प्रमाणित संस्थांनीही याबाबत दाखले दिले आहेत. त्याची दखल घेऊन उत्तराखंड प्रशासनाने झालेली चूक दुरुस्त केल्याबद्दल पतंजली संस्थानने त्यांचे आभार मानले आहे. चुकीचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे, असे संस्थानने स्पष्ट केले.