प्राचार्य रमणलाल शहा यांची रविवारी ज्योतिष कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राचार्य रमणलाल शहा यांची रविवारी ज्योतिष कार्यशाळा
प्राचार्य रमणलाल शहा यांची रविवारी ज्योतिष कार्यशाळा

प्राचार्य रमणलाल शहा यांची रविवारी ज्योतिष कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः ज्योतिष विशारद प्राचार्य रमणलाल शहा व येथील भालचंद्र ज्योतिर्विद्यालय यांच्यातर्फे रविवारी (ता. २०) दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहादरम्यान टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिरात ज्योतिष कार्यशाळा होणार आहे. ही सर्वांसाठी खुली आहे.

‘ज्योतिष शास्त्राच्या एका नियमात जगातील बहुसंख्य व्यक्ती’ आणि ‘ज्योतिषशास्त्राची प्रचिती’ या प्राचार्य शहा यांच्या पुस्तकांचे प्रकाशन कार्यशाळेत होणार आहे. यावेळी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माजी सहायक आयुक्त श्याम देशपांडे, उद्योगपती संजय इनामदार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, तसेच भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे चंद्रकांत शेवाळे व बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणे शाखेचे नंदकिशोर जकातदार आणि चंदुकाका सराफ अँड सन्सचे अतुल शहा यांच्या हस्ते ज्योतिषांना गौरविण्यात येणार आहे

‘ज्योतिषशास्त्राच्या एका नियमात जगातील बहुसंख्य व्यक्ती’ या पुस्तकात जगातील एक हजार व्यक्तींच्या पत्रिका दिल्या आहेत. विवाह, घटस्फोट, प्रेमविवाह, शासकीय कामात यश, प्रतिष्ठा अशा अनेक विषयांची मांडणी या पुस्तकात आहे. ‘ज्योतिष शास्त्राची प्रचिती’ या पुस्तकात कुंडलीतील बारा स्थानांचे संपूर्ण विवेचन व शंभर पत्रिकांचे विश्लेषण आहे. ही ज्योतिष कार्यशाळा या दोन्ही पुस्तकांच्या आधारे होणार आहे.