कृष्णानगर पोलिस वसाहतीत पावणेचार लाखांची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णानगर पोलिस वसाहतीत 
पावणेचार लाखांची घरफोडी
कृष्णानगर पोलिस वसाहतीत पावणेचार लाखांची घरफोडी

कृष्णानगर पोलिस वसाहतीत पावणेचार लाखांची घरफोडी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगर पोलिस वसाहतीत भरदिवसा घरफोडीची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी पावणेचार लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घराचा लाकडी दरवाजा व लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कडीकोयंडा लावून बंद होता. कड्या उघडून चोरटा घरात शिरला. तीन लाख ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व पाच हजारांची रोकड असा एकूण तीन लाख ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस वसाहतीतच चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.