पुण्यातील परभणीकरांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील परभणीकरांचा स्नेहमेळावा
पुण्यातील परभणीकरांचा स्नेहमेळावा

पुण्यातील परभणीकरांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : जन्मभूमी परभणी जिल्ह्यातील आणि कर्मभूमी पुणे असणाऱ्या नागरिकांचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित ‘माझे पुण्यातील परभणीकर क्लब’ या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. समाजातील विविध स्तरावर कार्य करणारे मान्यवर या कार्यक्रमात एकत्र आले. कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक किशोर पिंगळीकर यांनी केले होते. पुण्यात असणाऱ्या परभणीतील नागरिकांसाठी, तरुण, व्यावसायिक यांच्यासाठी सहायता मोहीम हाती घेणार असल्याचे आयोजक समितीतील अनुराधा टल्लू यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमासाठी रेवती सौदिकर, केतकी देशपांडे, मुक्ता हमदापूरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.