गोवरपासून आपल्या पाल्याला जपा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवरपासून आपल्या पाल्याला जपा!
गोवरपासून आपल्या पाल्याला जपा!

गोवरपासून आपल्या पाल्याला जपा!

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : गोवर विषाणूपासून होणारा आजार असून, रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत आणि संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. सध्या शहरात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणेही आवश्‍यक झाले आहे. म्हणूनच, बालकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहनही राज्याच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

गोवरची लक्षणे
- सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला येणे, डोळे लाल होणे
- दोन-चार दिवसांनंतर अंगावर लाल पुरळ येणे
- कानामागे, चेहरा, छाती, पोटावर पुरळ पसरणे
- विषाणूच्या शरीरातील प्रवेशानंतर सात ते दहा दिवसांत लक्षणे दिसतात

रुग्णांवर होणारे परिणाम
- ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होणे
- त्यामुळे डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर होणे

आजारावर ‘अ’ जीवनसत्वाची मात्रा
- लागोपाठ दोन दिवस ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा
दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी

गोवर टाळण्यासाठी काय करावे?
- बालकांचे गोवर, रुबेला हे लसीकरण गरजेचे
- वेळापत्रकानुसार लसीकरण आवश्‍यक
- सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध
- डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

लसीचा डोस
- पहिला डोस - नऊ महिने पूर्ण ते १२ महिने वयोगट
- दुसरा डोस - १६ ते २४ महिने वयोगट