रक्तदानातील कार्याबद्दल बांगड यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदानातील कार्याबद्दल बांगड यांचा गौरव
रक्तदानातील कार्याबद्दल बांगड यांचा गौरव

रक्तदानातील कार्याबद्दल बांगड यांचा गौरव

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : ‘रक्ताचे नाते ट्रस्ट’चे अध्यक्ष राम बांगड यांचा रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जम्मू येथे नुकताच गौरव करण्यात आला. जम्मू येथील इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन इम्युनोहेमॅटोलॉजी या संस्थेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. या वेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचे स्वीय सहायक राजीव राय भटनागर यांच्या हस्ते बांगड यांना पुरस्कार देण्यात आला. रक्तदान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देशभरातून चार किंवा पाच संस्थांना हा सन्मान दरवर्षी प्रदान करण्यात येतो. बांगड यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून १५० पेक्षा अधिक वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मादान तर २१ वेळा प्लेटलेट्स दान केले आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'' मध्ये बांगड यांनी आजवर केलेले प्लाझ्मादानाचे काम विक्रम म्हणून नोंदविले गेले आहे.