चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) अमाल्गमेशन २.०
सहा चित्रकारांच्या विविध माध्यमांतील चित्रांचे ‘अमाल्गमेशन २.०’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. याचे उद्‍घाटन प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते होणार आहे.
कधी : गुरुवार (ता. १७) ते रविवार (ता. २०)
केव्हा : सकाळी ११ ते सायंकाळी ७
कुठे : दर्पण कलादालन, कलाछाया संस्था, पत्रकारनगर रस्ता

२) शंकर जयकिशन संगीत महोत्सव
शंकर जयकिशन संगीत महोत्सवांतर्गत संजीवकुमार आणि शशी कपूर यांच्या चित्रपटांतील शंकर जयकिशन यांचे संगीत लाभलेल्या लोकप्रिय गीतांच्या दृकश्राव्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे लेखन व सादरीकरण श्रीधर कुलकर्णी यांचे असून, दृकश्राव्य बाजू शरद आढाव यांनी सांभाळली आहे.
कधी : शुक्रवार (ता. १८)
केव्हा : सायंकाळी ५ ते ८
कुठे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, प्रभात रस्ता

३) ब्रश हट
चित्रकार अनिल गुजर यांच्या ‘ब्रश हट’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी आजवर चितारलेल्या चित्रांमधील निवडक कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतील.
कधी : शनिवार (ता. १९) ते सोमवार (ता. २७)
केव्हा : सकाळी १० ते रात्री ९
कुठे : इंक फ्लोट, युनिट नंबर १, एरंडवणा सेंट्रलच्या मागे, कर्वे रस्ता

४) नॉस्टेल्जिया
अंतर्नाद कला साधना या संस्थेतर्फे ‘नॉस्टेल्जिया’ या संगीतकार शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेल्या अजरामर व लोकप्रिय गीतांच्या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संकल्पना डॉ. गौरी बापट यांची, निवेदन नीता उपासनी यांचे, दृकश्राव्य रचना डॉ. आशिष चौहान यांची असून, यात प्रिया अय्यर, अनुजा गाडे, अनघा पाठक, योगेश पाटील आणि डॉ. आनंद जोशी हे कलाकार सहभागी होणार आहेत.
कधी : रविवार (ता. २०)
केव्हा : सायंकाळी ५ ते ८
कुठे : निवारा वृद्धाश्रम सभागृह, नवी पेठ

५) संगीत मैफील
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सी. आर. व्यास यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत पं. विभव नागेशकर यांचे तबलावादन आणि पं. सुहास व्यास यांचे गायन होणार आहे.
कधी : रविवार (ता. २०)
केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता
कुठे : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता

६) ये शाम कुछ अजीब है
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचतर्फे लोकप्रिय गायक किशोरकुमार यांच्यावर आधारित ‘ये शाम कुछ अजीब है’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विजय केळकर, सचिन धामणे, संदीप कोळी, सुजित कात्रे, संदीप पेटारे, शैलेश घावटे आदी सहभागी होणार आहेत.
कधी : सोमवार (ता. २१)
केव्हा : सायंकाळी ५ वाजता
कुठे : पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच, लक्ष्मी रस्ता