अष्टांग महाविद्यालयात रोगनिदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अष्टांग महाविद्यालयात रोगनिदान शिबिर
अष्टांग महाविद्यालयात रोगनिदान शिबिर

अष्टांग महाविद्यालयात रोगनिदान शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात संस्थापक वैद्यराज हरिभाऊ परांजपे यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार (ता. १८) ते रविवारपर्यंत (ता. २०) सकाळी नऊ ते दुपारी एक यावेळेत मोफत सर्व रोगनिदान चिकित्सा शिबिर व वनौषधी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती अष्टांग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हेमलता जालगांवकर यांनी दिली.
या शिबिरामध्ये नेत्रतपासणी, शस्त्रकर्म सल्ला, मधुमेही नेत्रविकार जनजागृती, रुग्णांना मोफत चष्मे वाटप, कान, नाक, घसा तपासणी, स्त्रियांचे विशिष्ट आजार, गर्भसंस्कार समुपदेशन, आमवात, संधिवात, डेंगी चिकित्सा आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून, गरजूंनी सदाशिव पेठ, वैद्यराज हरिभाऊ परांजपे चौक, एस. पी. कॉलेज मागे, साने गुरुजी रस्ता, पुणे या पत्त्यावर अथवा ९०२२५६४११४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयुर्वेद शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. म. ह. परांजपे यांनी केले आहे.