डॉ. देवळाणकर राज्याचे नवे उच्च शिक्षण संचालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. देवळाणकर राज्याचे नवे उच्च शिक्षण संचालक
डॉ. देवळाणकर राज्याचे नवे उच्च शिक्षण संचालक

डॉ. देवळाणकर राज्याचे नवे उच्च शिक्षण संचालक

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्याकडून वैद्यकीय कारणाने पदभार काढून घेण्यात आला आहे. आता त्यांची सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता डॉ. देवळाणकर हे राज्याच्या नवे उच्च शिक्षण संचालक असणार आहेत.

उच्च शिक्षण विभागाच्या संचालक पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उमेदवाराची नियुक्ती होईपर्यंत डॉ. देवळाणकर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात हा पदभार सोपविण्यात आला आहे. डॉ. माने यांना दृष्टिदोष निर्माण झाल्याने त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात यावे, अशी मागणी काही संघटनांनी लावून धरली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांना दृष्टिदोष असल्याचे दिसून आल्याने त्यांची मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय मंडळाने दिलेल्या अहवालामध्ये डॉ. माने हे पुढील सेवा करण्यास पूर्णपणे व कायमपणे अक्षम असल्याचे प्रमाणित केले आहे. परंतु डॉ. माने यांचा उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन आता त्यांच्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंबंधी जबाबदारीचे कामकाज सोपविण्यात आले आहे. नवनियुक्त उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर हे आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण विषयातील अभ्यासक आहेत. सध्या ते मुंबई विद्यापीठात प्रभारी कुलसचिव म्हणून कार्यरत होते. आता उच्च शिक्षण विभागाच्या संचालक पदावर लोकसेवा आयोगामार्फत उमेदवाराची नियुक्ती होईपर्यंत डॉ. देवळाणकर यांच्याकडे हा पदभार राहणार आहे.