अकृषी विद्यापीठांत भरतीस मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकृषी विद्यापीठांत भरतीस मान्यता
अकृषी विद्यापीठांत भरतीस मान्यता

अकृषी विद्यापीठांत भरतीस मान्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे व शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील मंजूर असलेल्या शिक्षक आणि शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदे भरती करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विविध विद्यापीठांमधील रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला असला तरीही प्रत्यक्षात एकूण एक हजार १६६ जागा रिक्त आहेत. त्यातील ६५९ जागा भरण्यासाठी मान्यता मिळाली असून उर्वरित ५०७ जागा रिक्त राहणार आहेत.

घडामोडी :
- राज्य सरकारने २५ मे २०१७ च्या निर्णयानुसार सुधारित आकृतिबंध मंजूर होईपर्यंत बंदी होती
- उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली शिक्षकीय पदांचा आकृतिबंध सुधारित करण्याची कार्यवाहीस सुरूवात
- या काळात सेवानिवृत्ती व इतर कारणास्तव विद्यापीठांमधील पदे झाली रिक्त
- उपसमितीच्या १६ जुलै २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत १५ अकृषी, अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर पदांच्या ८० टक्के पदभरतीस मान्यता
- उपसमितीच्या मंजुरीनुसार ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता
- कोरोनाच्या परिस्थितीत पदभरतीवर निर्बंध
- त्यामुळे पदे मान्य होऊनही भरती नाही
- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भरतीसाठी पुन्हा पुन्हा वित्त विभागास प्रस्ताव सादर
- त्याअनुषंगाने वित्त विभागाने स्थापलेल्या उपसमितीच्या १८ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यतेसाठी प्रस्ताव सादर
- उपसमितीची ६५९ पदे भरण्यास मंजुरी
- राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे आणि सरकार मान्य अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर असलेल्या शिक्षक व शिक्षक समकक्ष अशा एकूण ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिल्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा अध्यादेश

मान्यता मिळालेल्या पदांची संख्या :
विद्यापीठाचे नाव : मंजूर पदे : रिक्त पदे : भरतीस मान्यता मिळालेली पदे
मुंबई विद्यापीठ : ३७८ : २११ : १३६
एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई : २५८ : १२९ : ७८
कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक : ४३ : २१ : १२
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : ३३९ : १६० : ९२
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : ४३ : २० : ११
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : ४६ : १६ : ०७
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : २६२ : १२४ : ७२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ४०० : १९१ : १११
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद : २७२ :१२८ : ७३
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : १११ : २८ : ०६
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : १६७ : ५४: २१
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : १२१ : ३७ : १३
डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे : ५३ : २५ : १४
गोखले अभिमत विद्यापीठ, पुणे : २४ : १३ : ०८
टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठ, पुणे : १७ : ०९ :०५