चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) ‘नॉस्टेल्जिया’ ः
अंतर्नाद कला साधना या संस्थेतर्फे ‘नॉस्टेल्जिया’ या संगीतकार शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेल्या अजरामर व लोकप्रिय गीतांच्या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची संकल्पना डॉ. गौरी बापट यांची, निवेदन नीता उपासनी यांचे, दृकश्राव्य रचना डॉ. आशिष चौहान यांची असून, यात प्रिया अय्यर, अनुजा गाडे, अनघा पाठक, योगेश पाटील आणि डॉ. आनंद जोशी हे कलाकार सहभागी होणार आहेत.
कधी : रविवार (ता. २०)
केव्हा : सायंकाळी ५ ते ८
कुठे : निवारा वृद्धाश्रम सभागृह, नवी पेठ

२) ‘ये शाम कुछ अजीब है’
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचतर्फे लोकप्रिय गायक किशोरकुमार यांच्यावर आधारित ‘ये शाम कुछ अजीब है’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात विजय केळकर, सचिन धामणे, संदीप कोळी, सुजित कात्रे, संदीप पेटारे, शैलेश घावटे आदी सहभागी होणार आहेत.
कधी : सोमवार (ता. २१)
केव्हा : सायंकाळी ५ वाजता
कुठे : पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच, लक्ष्मी रस्ता

३) संगीत मैफील ः
प्रेरणा संगीत संस्थेतर्फे दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात पहिल्या दिवशी सानिया पाटणकर यांच्या शिष्यांचे गायन होणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी ‘घराणा संमेलन’या कार्यक्रमांतर्गत गायक आशिष रानडे, गायिका ज्योती अय्यर आणि सानिया पाटणकर यांचे गायन होणार आहे.
कधी ः सोमवार (ता. २१) व मंगळवार (ता. २२)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः पत्रकार भवनचे कमिन्स सभागृह, नवी पेठ