महिलांसाठी मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांसाठी मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर
महिलांसाठी मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर

महिलांसाठी मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने २५ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी २१ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पूर्ण आठवडाभर सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत पूना हॉस्पिटलमध्ये मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या माध्यमातून स्तनांच्या कर्करोग विकाराची मोफत स्क्रिनींग तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकता असलेल्या महिलांची मॅमोग्राफी करणार आहे.
देशात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा एक स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ मध्ये आढळतात. सुरवातीला या कर्करोगाची काहीच लक्षणे दिसत नाहीत. अशा विकारांचे वेळीच निदान करण्यासाठी महिलांनी वय वर्षे २५ पासून ६५ वर्षांपर्यंत नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी हे मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरात सहभाग व नावनोंदणीसाठी संपर्क : ०२०-६६०९६००० एक्स्टेंशन- ३०८०/१२१२