पुणे कँटोन्मेंट बँकेच्या अध्यक्षपदी कैलास कोद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे कँटोन्मेंट बँकेच्या 
अध्यक्षपदी कैलास कोद्रे
पुणे कँटोन्मेंट बँकेच्या अध्यक्षपदी कैलास कोद्रे

पुणे कँटोन्मेंट बँकेच्या अध्यक्षपदी कैलास कोद्रे

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : पुणे कँटोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर बँकेच्या अध्यक्षपदी कैलास सखाराम कोद्रे आणि उपाध्यक्षपदी साहेबराव लोणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २०२२-२०२७ ची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांच्या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदी कैलास सखाराम कोद्रे आणि उपाध्यक्षपदी साहेबराव लोणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक (सहकारी संस्था) स्नेहा जोशी उपस्थित होत्या. सभेचे कामकाज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील यांनी पाहिले.

बँकेचे नवनिर्वाचित संचालक :
कैलास सखाराम कोद्रे, कैलास रामचंद्र कोद्रे, नंदकिशोर बिडकर, संदीप कोद्रे, ॲड. अविनाश कवडे, संजय फटके, देवेंद्र भाट, मंगल टिळेकर, स्मिता लडकत, ॲड. दिलीप जगताप, ज्ञानेश्वर मोझे, शांताराम चौधरी, साहेबराव लोणकर, अनिल आबनावे, किशोर संघेलिया