भूमि अभिलेखाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूमि अभिलेखाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
भूमि अभिलेखाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

भूमि अभिलेखाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांकडे जमीन मोजणी तसेच प्रॉपर्टी कार्डसंदर्भात दाखल झालेल्या अपिलांवर सुनावणी होऊन निर्णय दिले जातात. या अधिकाऱ्यांना जमीन महसुल कायद्याची अधिक माहिती मिळावी, यासाठी आयएलएस लॉ कॉलेजच्या सहकार्याने अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा फायदा राज्यातील सुमारे ८०० अधिकाऱ्यांना होणार आहे अशी माहिती जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली.

भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांचे हे पद अर्धन्यायिक पद आहे. त्यामुळे त्यांना कायदेविषयक माहितीविषयी असणे आवश्‍यक आहे. अर्धवट माहिती अथवा चुकीचे निर्णय होऊन त्यांचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. त्यामुळे उपअधिक्षक पदावरील तसेच इतर अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ४५० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आयएलएस लॉ कॉलेजमध्ये चार दिवसांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहे. यासाठीचा अभ्यासक्रम आयएलएस लॉ कॉलेजने तयार केला आहे. यामध्ये जमीन विषयक दाव्यांविषयी माहिती, कायदे यांची माहिती दिली जात आहे. तसेच अनुभवी विधी तज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे.