भूमिअभिलेखची परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूमिअभिलेखची परीक्षा
२८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान
भूमिअभिलेखची परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान

भूमिअभिलेखची परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : भूमिअभिलेख विभागाकडील भूकरमापक व लिपिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी दिली. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in वरील लिंकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. त्यावरील नमूद परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे भूमिअभिलेख विभागाद्वारे सांगण्यात आले.