सिनेटच्या मतदानाला जाताना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिनेटच्या मतदानाला जाताना...
सिनेटच्या मतदानाला जाताना...

सिनेटच्या मतदानाला जाताना...

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः देशाची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्याचे प्रतिबिंब हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा उमटते. त्या अधिसभेच्या पदवीधर गटासाठी रविवारी (ता. २०) मतदान होत आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील तब्बल एक लाख २० हजार पदवीधर मतदान करणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

१) मतदान कोण करणार?
विद्यापीठाकडे अधिकृत पदवीधर नोंदणी केलेले आणि विद्यापीठाने घोषित केलेल्या मतदार यादीतील व्यक्ती अधिसभेसाठी मतदान करू शकते. यासंबंधीची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

२) मतदान कोठे करणार?
तीनही जिल्ह्यांत ७१ मतदान केंद्र केले आहे. शक्यतो आपण ज्या ठिकाणी मतदारयादीसाठी अर्ज केला असेल, तिथेच आपले मतदान असण्याची जास्त शक्यता आहे. संकेतस्थळावर अधिकृत मतदान केंद्र दिले आहे. तिथे आपला मतदाता क्रमांक आणि केंद्र आपल्याला मिळेल.

३) मतदान कसे कराल?
- मतदानाला जाताना सोबत ओळखपत्र ठेवावे. (उदा. आधारकार्ड)
- मतदान प्राधान्य क्रमाने करावयाचे असल्याने मतपत्रिकेवर आपल्या पसंतीप्रमाणे उमेदवारांना इंग्रजी किंवा मराठीत क्रमांक द्यावे. रोमन अंक किंवा वर्तुळ आदी खुणा करू नये
- खुल्या प्रवर्गासाठी एक मतपत्रिका व आरक्षित प्रवर्गासाठी पाच मतपत्रिका मिळतील
- निवडणूक यंत्रणेने उपलब्ध केलेल्या पेनद्वारेच पसंती क्रमांक लिहावा
- मतदारांनी मोबाईल किंवा इतर संयंत्रे केंद्रावर नेण्यास बंदी आहे

मतदानासाठी महत्त्वाचे ः
वेळ ः सकाळी १० ते दुपारी पाच
मतदार ः ८८,९००
मतदान केंद्रे ः ७१
बूथ ः ११४
अधिकृत संकेतस्थळ ः https://election.unipune.ac.in/