चांदीची मुर्ती चोरणाऱ्या महिलेस अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदीची मुर्ती चोरणाऱ्या महिलेस अटक
चांदीची मुर्ती चोरणाऱ्या महिलेस अटक

चांदीची मुर्ती चोरणाऱ्या महिलेस अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : येथील नागरिकाच्या घरी काम करत असतानाच देवघरातून एक किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरुन नेणाऱ्या महिलेस कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी हुकुमचंद कोटेचा (रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन ५० वर्षीय महिलेस अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी कोटेचा हे कोरेगाव पार्क परिसरात राहतात. त्यांच्याकडे काही महिन्यांपासून संबंधित महिला घरकाम करण्यासाठी येत होती. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेने कोटेचा यांच्या देवघरातील एक चांदीची मूर्ती चोरली. त्यानंतर घरकाम करणारी महिला पसार झाली होती. याप्रकरणी कोटेचा यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून संबंधित गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच कोरेगाव पार्क भागातील साऊथ मेन रोडवर संबंधित महिला थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी महिलेस ताब्यात घेऊन तिला अटक केली. महिलेकडून चांदीची मूर्ती, चांदीचा हार तसेच देवघरातील पूजा साहित्य असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दीपाली भुजबळ, दत्तात्रेय लिंगाडे, नामदेव खिलारे, रमजान शेख, विजय सावंत, विवेक जाधव, ज्योती राऊत, वैशाली माकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.