वाल्हेकरवाडीतील घरांसाठी अर्जाची मुदत सोमवारपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हेकरवाडीतील घरांसाठी
अर्जाची मुदत सोमवारपर्यंत
वाल्हेकरवाडीतील घरांसाठी अर्जाची मुदत सोमवारपर्यंत

वाल्हेकरवाडीतील घरांसाठी अर्जाची मुदत सोमवारपर्यंत

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) विकसित केलेल्या मौजे वाल्हेकरवाडी पेठ क्र. ३० आणि पेठ क्र. ३२ मधील घरांसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी (ता. २१) रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीच्या आत अर्ज करावे, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

अर्ज नोंदणीची मुदत सोमवारपर्यंत असून, सोडतीसाठी ऑनलाइन अर्जाची समाप्ती मंगळवार (ता. २२) रोजी आहे. त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी तत्काळ नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. वाल्हेकरवाडी येथील गृहयोजना प्रकल्पातील एकूण ५५ विंगला वेगवेगळी नावे देणेचे प्रस्तावित आहे. तरी नागरिकांनी ५५ विंगला द्यावयाच्या नावांची संकल्पना (उदा. गडांची नावे, संतांची नावे, नद्यांची नावे आदी) तयार करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुख्य इमारत, तिसरा मजला, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे-४११०४४ या पत्त्यावर ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवावीत. प्राप्त नावांच्या संकल्पानांपैकी सर्वोत्कृष्ट संकल्पना कार्यालयामार्फत निवडण्यात येईल व विजेत्यांना प्राधिकरणातर्फे बक्षिसे देण्यात येतील, असेही प्राधिकरणाने कळविले आहे.
​​​​​​​​​​