जनाधिकार सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी संभूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनाधिकार सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी संभूस
जनाधिकार सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी संभूस

जनाधिकार सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी संभूस

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : येथील विमा कंपन्या, बँक, मोबाईल, वीज कंपन्या, आयटी कंपनी, लघु व मध्यम उद्योग यासह इतर सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून न्याय मिळत नसेल, तक्रारींची दखल घेतली जात नसेल तर नागरिकांनी मनसेच्या जनाधिकार सेनेकडे तक्रार करावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हेमंत संभूस यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच जनाधिकार सेनेची स्थापना करून त्याच्या प्रदेशाध्यक्षपदी संभूस यांची निवड केली आहे. सेवा क्षेत्रासह इतर क्षेत्रात जेथे नागरिकांचा अधिकार डावलण्यात येतो तेथे ही संघटना नागरिकांच्या मदतीला धावून येईल. संघटनेची बांधणी सुरू असून, यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संभूस यांनी केले.