महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थापनेची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थापनेची गरज
महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थापनेची गरज

महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थापनेची गरज

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : अनेकदा महिलेला पोलिस दलात येण्यापासून परावृत्त केले जाते. पोलिस दलात जाण्यापेक्षा शिक्षक अथवा बँकेची नोकरी स्वीकार असे घरातून सांगितले जाते. त्यामुळे इच्छा असूनही अनेक महिला, तरुणी पोलिस दलात येण्यापासून वंचित राहतात. पोलिस दलात ३३ टक्के महिला असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पुरुषांच्या तुलनेत केवळ १० टक्के महिलाच पोलिस दलात कार्यरत आहे. महिला भरतीसाठी येतात मात्र त्या शारीरिक क्षमतेच्या परीक्षेत नापास होतात. त्यामुळे समाजात महिला पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र स्थापन होणे गरजेचे असल्याचे राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.

ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था आणि स्त्रीशक्ती प्रबोधन कार्यदिशा यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथील गणेश हॉलमध्ये परिसंवादाचे आयोजन केले होते. माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुधा कोठारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे, ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्थेचे अनघा लवळेकर, स्त्री शक्ती ग्रामीणच्या प्रमुख सुवर्णा गोखले, स्त्री शक्ती प्रबोधन कार्यदिशाचे गौरी कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला पोलिस ठाणी, उपलब्धी व आव्हाने हा परिसंवादाचा विषय होता. परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात प्रवीण दीक्षित यांनी आपले विचार मांडले. समाजाचे प्रतिबिंब जसे राजकारणात उमटते. तीच बाब पोलिस प्रशासनाला देखील लागू पडते. कारण जसे आपण असू तसे पोलिस असतात. महिलांना तक्रार देण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मात्र अनेकदा त्यांना तक्रार देण्यापासून रोखले जाते. त्यामुळे अनेक गुन्हेगार गुन्हा करून देखील सुटतात.

दैनिक ''सकाळ''चे मुख्य बातमीदार मंगेश कोळपकर आपल्या मनोगतात म्हणाले, क्राईम रिपोर्टींग करताना गुन्हेगारी विषयीचे प्रश्न जवळून अभ्यासता आले. दोनशे वर्ष चालू असलेल्या व्यवस्थेतून न्याय मिळत नाही. पोलिस ठाण्यासाठी १२० अधिकारी व कर्मचारी असतात. ३३ टक्के आरक्षण असून देखील १० टक्के महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक होते. पोलिस ठाण्यातून आश्वासक वातावरण निर्माण झाले पाहिजे असे कोळपकर यांनी सांगितले.

तक्रार देताना घ्यावयाची खबरदारी :
महिला तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यावर त्या सर्वप्रथम कोणाशी बोलतात हे पहिले पाहिजे. ठाणे अंमलदार यांच्याकडे तक्रार दिली पाहिजे. तक्रार साध्या व सोप्या भाषेत नोंदवून घेतली पाहिजे.