इंदिरा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदिरा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन
इंदिरा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन

इंदिरा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः काँग्रेस पक्षाच्या वतीने दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम कॅम्प येथील इंदिरा गांधी चौक येथे झला. या प्रसंगी पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य विजय जाधव यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉकचे माजी अध्यक्ष सुलतान खान, शहर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिजित शिवरकर, अमिन शेख, वहिदा बियाबानी, हसन कुरेशी, संजय सकट आदी उपस्थित होते.

पार्किन्सन रुग्णांसाठी विनामूल्य कार्यशाळा
पुणे, ता. १९ ः बी. के. पारखे पार्किन्सन डिसिज ॲण्ड मूव्हमेंट डिसॉर्डर सोसायटीच्या वतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पार्किन्सन रुग्णांसाठी विनामूल्य कार्यशाळा आयोजित केली जाते. यामध्ये आजारांसंबंधी केले जाणारे वैद्यकीय शोध, फिजिओथेरपी, समुपदेशन, आहार-पोषण, उपचारपद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाते. ही कार्यशाळा प्रत्येक शनिवारी रुग्णालयामध्ये सकाळी १०.१५ ते १२.१५ या वेळेमध्ये घेतली जाते. यासाठी ९६६५०७५६०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.