युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकत युवती सेनेतील ३५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. या पदाधिकाऱ्यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. यावेळी युवती सेना सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक पदाधिकारी, आमदार, खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तरुण पदाधिकारी नाराज असून, युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. येवले म्हणाल्या, ‘‘गेल्या काही दिवसांपासून पक्षात गोंधळ सुरू आहे, त्यामुळे युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील ३५ युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तरुणी व महिलांचा राजकारणातील वावर कमी आहे. पण, जे राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा तरुणींना होणारा त्रास लक्षात घेतला पाहिजे. पक्षातील वरिष्ठ नेते याची दखल घेत नाहीत.’’