तांबे, विनय र. र., पारखी यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांबे, विनय र. र.,
पारखी यांचा गौरव
तांबे, विनय र. र., पारखी यांचा गौरव

तांबे, विनय र. र., पारखी यांचा गौरव

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्यातर्फे आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ‘गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार व इंदिराबाई अत्रे पुरस्कार’ देण्यात येतो. यंदाचा ‘आबासाहेब अत्रे पुरस्कार’ बालसाहित्यिक व ‘गंमत शाळेचे’ संकल्पनाकार शिक्षणतज्ज्ञ राजीव तांबे यांना तर ‘इंदिराबाई अत्रे पुरस्कार’ माजी प्राध्यापक व विज्ञान प्रसारक विनय र. र. व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार संयोजन समितीचे प्रमुख प्रसाद भडसावळे यांनी ही माहिती दिली. ‘आबासाहेब अत्रे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही मौलिक कार्य केले. तर इंदिराबाई अत्रे यांनीही अध्यापनासोबतच आपल्या कलागुणांना जाणीवेने जोपासले आणि त्याचा इतरांना लाभ करून दिला. त्यामुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्त्वांना दरवर्षी त्यांच्या नावाचा हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांचे हे अकरावे वर्ष आहे. बुधवारी (ता. ३०) सायंकाळी ५.३० वाजता सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी येथे संस्थेच्या खुल्या सभागृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील’, असे भडसावळे यांनी सांगितले.