सोशल इनोव्हेशन पुरस्काराचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल इनोव्हेशन पुरस्काराचे वितरण
सोशल इनोव्हेशन पुरस्काराचे वितरण

सोशल इनोव्हेशन पुरस्काराचे वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. २० : पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारा सोशल इनोव्हेशन पुरस्कार यावर्षी ‘स्वच्छ सस्टेनेबेल सोल्यूशन्स’ आणि ‘कृषीगती आणि मुदिता अ‍ॅन्ड राधेश प्रा.लि’. यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार शहरी, ग्रामीण आणि आदिवासी श्रेणीमध्ये देण्यात आला. ‘पीआयसी’तर्फे सोशल इनोव्हेशन या विषयावर आयोजित १० व्या राष्ट्रीय परिषदेच्या (नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन - एनसीएसआय) समारोप सत्रात हा पुरस्कार दिला. याप्रसंगी टाटा इंडस्ट्रीज लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर चौकर, प्रख्यात शास्त्रज्ञ व पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संचालक अभय वैद्य, सोशल इनोव्हेशन लॅबचे प्रमुख मंदार जोशी आदी उपस्थित होते. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्ष संगीता जिंदाल यांनी बीजभाषण केले.