अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

सारस पतसंस्थेतर्फे सतीश मराठेंचा सत्कार
पुणे, ता. २१ : भारतीय रिझर्व बॅंकेचे संचालक सतीश मराठे यांचा सारस पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. कर्वेनगर येथे झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गणेश धारप, उपाध्यक्ष दत्तात्रेय गोडबोले, सहकार विभागाचे माजी सहसंचालक विनायक साखरे, सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रकाशन प्रमुख भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. पुरस्काराच्या धन्यवाद भाषणात मराठे म्हणाले, ‘देशात साडे आठ लाख सहकारी संस्था कार्यरत आहे. वाढती गरज लक्षात घेता संस्थांनी संगणकीकरणाची आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. कारण याच संस्था ग्रामिण अर्थकारणाचा महत्त्वाचा कणा आहे’. यावेळी सूत्रसंचालन श्रुती सोमण यांनी केले तर, आभार विनायक बेहरे यांनी मानले.

‘काउंटरच्या आतून’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. २१ : बॅंक हा प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तसाच तो बॅंकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आहे. त्याचे अनुभव हे सामान्य माणसांप्रमाणे बॅंकिंग क्षेत्राला मार्गदर्शन ठरू शकतील, असे मत बॅंक ऑफ महाराष्ट्राचे माजी उपमहाप्रबंधक श्याम भुर्के यांनी व्यक्त केले. बॅंकेतील ३८ वर्षाच्या अनुभवावर आधारित शुभदा जोगळेकर यांनी लिहिलेल्या ‘काउंटरच्या आतून’या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी भगिनी निवेदिता बॅंकेच्या संचालक जयश्री काळे या प्रमुख पाहुण्या व उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशीही यावेळी उपस्थित होते.
--------------
प्रतापगडावर व्हावे जिवाजी महालेंचे स्मारक
पुणे, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे, अशी मागणी सकल नाभिक समाज व हिंदू महासभेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारकडे अनेकदा मागणी करूनही या संबंधी कोणताच निर्णय घेतला जात नाही. म्हणून संघटनांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. एक जानेवारीपर्यंत काही निर्णय न झाल्यास, १४ जानेवारीनंतर समाज बांधव प्रतापगडावर जाऊन स्मारकाचे भूमिपूजन करू, असा इशारा सकल नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
----------