अहवालाची अजूनही प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहवालाची अजूनही प्रतीक्षा
अहवालाची अजूनही प्रतीक्षा

अहवालाची अजूनही प्रतीक्षा

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः नवले पुलावरील अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी रविवारी रात्रीच आरटीओ व पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. यासाठी आरटीओ प्रशासनाने दोन मोटार वाहन निरीक्षकांकडे तपास करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी ट्रकचा अहवाल प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मात्र, अद्याप तो जाहीर केला नाही. यावर आरटीओ प्रशासन आम्हाला अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगत आहे.
नवले पुलाजवळील अपघातानंतर आरटीओचे दोन मोटार वाहन निरीक्षक घटनास्थळी पोचले. रविवारी मध्यरात्री एक ते दीड वाजेपर्यंत ट्रकची पाहणी करून ब्रेक निकामी होऊन अपघात झाला की अन्य कारणांमुळे, याची पाहणी त्यांनी केली. तसेच, इंजिनमध्ये कुठे बिघाड झाला होता का?, विमा होता का?, याची तपासणी केली. याचा सविस्तर अहवाल सोमवारी आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र, आरटीओ प्रशासन यावर बोलणे टाळत आहे. अद्याप अहवाल मिळाला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

चालकाच्या चुकीमुळे अपघात ?
ट्रकच्या अपघातप्रकरणी अधिकृतपणे अहवाल जाहीर झाला नसला तरीही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकच्या ब्रेकमध्ये कोणताही बिघाड नव्हता. ब्रेकिंग यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत होती. ट्रक चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे समजते. आरटीओ प्रशासनाने अहवाल आणखी प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.

वाहनात बिघाड झाला होता की, चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला?, याचा शोध घेतला जात आहे. यासाठी मोटार वाहन निरीक्षकांनी संबंधित वाहनाची तपासणी केली. याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.
- डॉ. अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे